China Discovers New Virus: चीनमध्ये सापडला नवीन व्हायरस, कोरोनापेक्षाही भयंकर असल्याचा दावा

त्यामुळे पुन्हा एकदा जगभरात तशीच परिस्थिती निर्माण होणार का?
Published by :
Team Lokshahi

संपूर्ण जगभरात 2020 साली कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. सर्व जगभरात लॉकडाउन लागला होता. आजही कोरोनाचे अनेक परिणाम लोकांना भोगावे लागत आहेत. यातून बाहेर पडत असतानाच चीनमधील शास्त्रज्ञांना एका नवीन व्हायरसचा शोध लागला आहे. हा नवीन करोंना व्हायरस वटवाघळांमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगभरात तशीच परिस्थिती निर्माण होणार का? अशी भीती सगळ्यांच्याच मनात निर्माण झाली आहे.

चिनी संशोधकांच्या एका टीमने वटवाघुळांमधील नवा करोना व्हायरस शोधला आहे. या नवीन व्हायरसचे नाव ‘HKU5-CoV-2’ असं आहे. हा व्हायरस मर्बेकोव्हायरस (Merbecovirus) उपजनुकीय विषाणूंशी संबंधित आहे. तसेच हा नव्याने आढळलेला स्ट्रेन कोविड-19 प्रमाणेच आहे. कोविड-19 प्रमाणेच हा नवा विषाणू मानवी पेशींमधील ACE2 रिसेप्टरबरोबर जोडला जाऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com