Shinchan Home
Shinchan Home

Shinchan: चिनी तरूणाने बनवलं हुबेहूब शिनचॅनच्या घरासारखं घर

चीनमधील झेजियांग प्रांतामध्ये एका युवकाने शिनचॅनच्या घराची अचूक प्रतिकृती साकारली आहे. त्याने बनवलेलं हे घर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published by :
Published on

भावाचा नादच खुळा! चीनमधील एका तरूणाने आपलं आवडतं अॅनिमे कॅरेक्टर शिनचॅनच्या घरासारखेच हुबेहूब घर प्रत्यक्षात साकारलं आहे. त्याच्या या घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

चीनमधील झेजियांग प्रांतातील 21 वर्षीय जियांग नावाच्या तरूणाने हा पराक्रम केला आहे. आपल्या आवडीच्या अॅनिमे कॅरेक्टर शिनचॅनच्या सिरीजमधील घर प्रत्यक्षात साकारण्याचा त्याचा हा प्रवास सोप्पा नव्हता. सर्वप्रथम त्याने आपल्या कुटुंबाच्या मेंढीचे फार्म ताब्यात घेतले. त्यानंतर क्रेयॉन शिनचॅनकडून परवानगी मिळवण्यासाठी वर्षभराहून अधिक काळ पायपीट केली. या संपूर्ण प्रक्रियेसाठी शांघाय शहर त्याला पाचवेळा गाठावं लागलं.

कोण आहे शिनचॅन?

शिनचान एक काल्पनिक पात्र आहे. एक प्रेमळ ॲनिमे पात्र आहे. क्रेयॉन शिनचॅन या चित्रपट आणि टीव्ही मालिकेने 32 वर्षांपासून लहान मुले तसेच किशोरवयीन मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शिनचॅनचे पूर्ण नाव शिनोसुके नोहारा आहे. या अॅनिमे सिरीजमध्ये दाखवलेलं लाल आणि पांढऱ्या विटांचे राहण्यास योग्य असे घर तयार करण्यासाठी $400,000 (3.5 कोटी INR) खर्च करण्यात आले.

जियांगने या घराचे बांधकाम जुलै 2024 मध्ये सुरू केले. त्यासाठी खास डिझाईन केलेले साहित्य आवश्यक होते. ज्यामुळे प्रकल्पाची किंमत आणखी वाढली. हे स्वप्न साकार करण्यासाठी जियांगच्या आईने त्याला आर्थिक मदत केली. जवळजवळ पूर्ण झालेले घर सुमारे 100 चौरस मीटर व्यापलेले आहे. शिनचॅनच्या चाहत्यांसाठी आणि कॉस्प्लेअर्ससाठी हे घर आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

शिनचॅनचे कासुकाबे शहर प्रत्यक्षात उतरवण्याचे स्वप्न

जियांगच्या महत्त्वाकांक्षा या केवळ शिनचॅनच्या घरापुरता मर्यादित नाहीत. तर शिनचॅनच्या सिरीजमधील फुताबा किंडरगार्टनचीही प्रतिकृती त्याला साकारायची आहे. आणि त्याचा वापर शैक्षणिक सेवांसाठी करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे शिनचॅनमधील संपूर्ण कासुकाबे शहर प्रत्यक्षात तयार करायचे आहेत. जिथे चाहते शिनचॅनच्या काल्पनिक विश्वाला प्रत्यक्षात अनुभवू शकतील. जे यापूर्वी कधीही घडले नव्हते.

जियांगने एक जुनी कार देखील विकत घेतली आणि शिनचॅन सिरीजमधील हिरव्या वाहनासारखी बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

Shinchan Car in anime
Shinchan Car in anime
Shinchan Car Replica
Shinchan Car Replica
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com