Coronavirus Update
Coronavirus Update

Coronavirus Update: कोरोनाचा धोका वाढतोय; देशात कोरोना रुग्णांची संख्या 4 हजारांवर

कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Coronavirus Update ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे.

देशात कोरोना रूग्णांची संख्या 4 हजारांवर पोहचली असून महाराष्ट्रात सक्रिय 494 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर देशात एकूण कोरोना मृतांची संख्या 28 वर गेली असल्याची माहिती मिळत आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्या आणि सतर्क राहा, आणि लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगण्यात येतं आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com