Atishi Marlena: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा राजीनामा सुपूर्द!

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी राजीनामा दिला! भाजपच्या विजयामुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत जल्लोष, जाणून घ्या संपूर्ण बातमी.
Published by :
Prachi Nate

देशामध्ये गेले काही दिवस सर्वत्र दिल्ली निवडणुकांचे वारे वाहत असताना पाहायला मिळाले. 5 फेब्रुवारी 2025 रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. काल सकाळपासून मतदान मोजणीला सुरुवात झाली असून दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले दिसून आले. काल म्हणजेच 8 फेब्रुवारीला या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. ज्यामध्ये भाजप बहुमतांसह वरचढ ठरला.

त्यामुळे आपची जादूदेखील कमी झाली आहे. कॉंग्रेस पक्ष मात्र पूर्णतः पिछाडीवर गेलेला पाहायला मिळाला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला घव घवीत बहुमत मिळाल्यानंतर सर्वत्र भाजप कार्यालया बाहेर भाजप कार्यकर्त्यांचा ढोल तशा वाजवत जलोष करण्यात आला असून भाजपकडून दिल्लीपासून मुंबईपर्यंत विजयोत्सव साजरा केला गेला.

काल झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा राजीनामा सुपूर्द झाला आहे. उपराज्यपाल विनय सक्सेना यांच्याकडे त्यांना आपला राजीनामा सोपवला. दिल्ली निवडणुकीत आतिशी यांचा विजय झाला पण 'आप' पराभूत झाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com