Delhi Election Results: दिल्लीत कमळ फुललं, 27 वर्षांनंतर भाजपचा विजय! आपच्या दिग्गजांचा दारूण पराभव; काँग्रेसचा सुपडासाफ
देशामध्ये गेले काही दिवस सर्वत्र दिल्ली निवडणुकांचे वारे वाहत असताना पाहायला मिळाले. 5 फेब्रुवारी 2025 रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. आज सकाळपासून मतदान मोजणीला सुरुवात झाली असून दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले दिसून आले. आज 8 फेब्रुवारीला या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.
सुरुवातीच्या आकडेवारीपासूनच, भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत होते. दिल्ली विधानसभेचे 70 जागांचे प्राथमिक कल हाती आले. यामध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसून आलं. 2025 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप वरचढ ठरला आहे. त्यामुळे आपची जादूदेखील कमी झाली आहे. कॉंग्रेस पक्ष मात्र पूर्णतः पिछाडीवर गेलेला पाहायला मिळाला आहे. आता हे सिद्ध झालेलं पाहायला मिळत आहे की, दिल्ली जनतेने त्यांचा कौल भाजपला दिलेला आहे. दिल्लीमध्ये भाजपने गड राखला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला घव घवीत बहुमत मिळाल्यानंतर सर्वत्र भाजप कार्यालया बाहेर भाजप कार्यकर्त्यांचा ढोल तशा वाजवत जलोष करण्यात आला असून, भाजपकडून दिल्लीपासून मुंबईपर्यंत विजयोत्सव साजरा केला जातो आहे. तब्बल 13 वर्ष आम आदमी पक्षाचे दिल्ली मध्ये वर्चस्व होतं मात्र या निवडणुकीत भाजप पक्षाचा विजय झाला आहे त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच आता आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पराभूत करणारे भाजपचे नेते परवेश वर्मा जायंट किलर ठरलेत. परवेश वर्मा दिल्ली भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहराही असू शकतो अशी शक्यता आहे.