Dhaka FlighT Accident : ढाकामध्ये शाळेच्या इमारतीवर विमान कोसळले
विमान अपघताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. मागील महिन्यात झालेल्या एअरइंडियाच्या विमान अपघातानंतर विमान दुर्घटनेची जणू मालिकाच सुरु असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आज दुपारच्या सुमारास बांग्लादेश मधील ढाका येथे माईलस्टोन आणि कॉलेजच्या परिसरात एक फायटर जेट अचानक कोसळले. यामुळे त्या भागात एकच गोंधळ उडाला.
बांग्लादेशची राजधानी ढाका येथील उत्तरेकडील भागात माईलस्टोन शाळेच्या आणि कॉलेजच्या परिसरात दुपारी दीडच्या सुमारास जोरदार आवाज झाला. त्या भागात F-7 BGI हवाई दलाचे प्रशिक्षण विमान अचानक कोसळले. त्यावेळी नेमकी शाळा सुरु असल्यामुळे शाळकरी मुलांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. ही घटना घडल्यानांतर तात्काळ अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
या झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर त्या परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. या अपघातात विमानाच्या पायलटच्या मृत्यू झाला आहे. विमानाचा अपघात कोणत्या कारणामुळे झाला याची अद्याप माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी बांग्लादेश चे लष्करी सैन्य, सिव्हिल डिफेन्स पथक याचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.