Donald Trump
Donald Trump

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादले 100 टक्के टॅरिफ

1 नोव्हेंबरपासून चीनवर 100% कर
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादले 100 टक्के टॅरिफ

  • अमेरिका-चीन व्यापार युद्ध पुन्हा सुरू झाले

  • 1 नोव्हेंबरपासून चीनवर 100% कर

(Donald Trump) डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादले 100 टक्के टॅरिफ लादले आहे. ट्रम्प यांच्याकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर एक पोस्ट करत नवीन कर जाहीर करण्यात आले आहे.अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमधील तणाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हा कर आधीच लागू असलेल्या शुल्कांव्यतिरिक्त असणार असल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या दुर्मिळ पृथ्वी खनिजांच्या निर्यातीवर चीनने बंदी घातल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढत असून याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चिनी उत्पादनांवर जास्त कर लावण्याची घोषणा केली आहे.

1 नोव्हेंबर 2025 पासून चिनी वस्तूंवर 100 टक्के आयातशूल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा त्यांनी केली आहे.अमेरिकेत निर्माण केलेल्या क्रिटिकल सॉफ्टवेअरवरही कठोर नियंत्रणे आणण्याची योजना त्यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला लक्ष्य केल्याचे तसेच अमेरिका-चीन व्यापार युद्ध पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com