Indian Word Ban: डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान, ‘इंडियन’ शब्दावर बंदी; नेमकं प्रकरण काय?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत करण्यात आलेल्या त्यांच्या विधानांमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. त्यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला असून, केवळ टॅरिफच नाही, तर अनेकदा भारताविषयी धक्कादायक विधानं केली आहेत. ट्रम्प म्हणाले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी लागते. मात्र जगातील सर्वाधिक तेल खरेदी करणारा देश चीन आहे. परंतू चीनवर कोणताही टॅरिफ लावलेला नाही. या निष्पक्षतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याशिवाय, H-1B व्हिसा नियमांमध्ये अमेरिकेने बदल केला आहे. ज्यामुळे भारतीय कर्मचाऱ्यांना जास्त शुल्क भरावे लागेल. हे व्हिसा प्रकारावर तब्बल ८८ लाख रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. ट्रम्प यांनी मध्यंतरी म्हटले होते की, जर भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णतः बंद केली नाही तर यावर आणखी निर्बंध लादले जातील.
तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल एक मोठे विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेत ‘इंडियन’ हा शब्द वापरू नये असे विधान केले आहे. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेत या शब्दाला केंद्रस्तानी असून यावरून मोठा वाद सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे की ‘इंडियन’ हा शब्द फक्त भारतातील लोकांसाठी राखीव हवा, आणि तो मूळ अमेरिकन आदिवासींसाठी वापरू नये. त्यांच्या या विधानामुळे अमेरिकन आदिवासी समुदाय आणि भारतातील लोकांमध्ये विभाजन आणि चर्चा सुरु झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे हे बोलणे ऐकून भारतीयांना मोठा धक्का बसेल परंतू ते हे विधान भारतीय लोकांबद्दल बोलले आहेत. यांचा हा शब्द वापरासंबंधी वाद कोणत्या दिशेने पुढे जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण या संदर्भात अमेरिकन विविध संघटना वादविवाद करत आहेत. ट्रम्प यांच्याशी आदिवासी समुदायांचे वाद नवे नाहीत. कॅसिनो परवानग्या, अधिकारांवरील मतभेद आणि त्यांच्या काही सार्वजनिक विधानांमुळे ते अनेकदा विवादांत सापडले आहेत. ट्रम्प यांच्या भूमिकांमुळे सामाजिक आणि सांस्कृतिक चर्चांना नवीन विषय मिळाले आहेत.
ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ आणि तेल खरेदीबाबत कठोर टीका केली.
H-1B व्हिसा शुल्कवाढीमुळे भारतीय कर्मचाऱ्यांवर मोठा आर्थिक भार.
‘इंडियन’ शब्द अमेरिकन आदिवासींसाठी वापरू नये, असा ट्रम्प यांचा वादग्रस्त दावा.
या विधानांमुळे अमेरिकेत राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक वाद तीव्र.
