Donald Trump : 'या' 12 देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
(Donald Trump ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नवनवीन निर्णय घेण्यात येत आहेत. यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन घोषणा केली आहे. 12 देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 देशांमधील लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी ही घोषणा केली असून या नवीन घोषणेवर त्यांनी स्वाक्षरी देखील केली आहे. यासोबतच 7 देशामधून येणाऱ्या नागरिकांवर अंशत: बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता या देशांमधील लोकांना अमेरिकेत प्रवास करता येणार नाही आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या 12 देशांमध्ये अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, कांगो, इक्वेटोरियन गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुडान आणि येमेन या देशांचा समावेश आहे. तर 7 देशांमध्ये बुरुंडी, क्यूबा, लाओस, सिएरा लियोन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे.