Donald Trump
Donald Trump

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा भारताला धमकी; टॅरिफमध्ये आणखी वाढ करणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासंदर्भात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासंदर्भात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, टॅरिफ अर्थात आयात शुल्कात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धावर भारताची भूमिकेवर प्रतिक्रिया देत भारतावर नव्याने शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे.

याआधीच ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे भारताच्या व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यावर भारत सरकारकडून विविध आर्थिक अभ्यास सुरू असून संभाव्य नुकसानाची गणना आणि त्यावर उपाय शोधले जात आहेत.

ट्रम्प यांच्या नव्या पोस्टनुसार, भारताने रशियाकडून तेल खरेदी करून ते आंतरराष्ट्रीय बाजारात विकण्याची धोरणे स्वीकारल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांना वाटते की भारत रशियन तेलाचा फायदा उचलत असून, युक्रेनमधील मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर भारताने सहानुभूती दाखवलेली नाही.

त्यामुळे, अमेरिका भारतावरील शुल्क धोरणात अजून वाढ करू शकते, असे ट्रम्प सूचित करत आहेत. हे निर्णय अमेरिका-भारत व्यापारसंबंधांवर मोठा परिणाम करू शकतात. अमेरिकेच्या या संभाव्य निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून टॅरिफमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाचे मूल्यमापन सुरू आहे. भारताने आगामी धोरण ठरवण्यासाठी चर्चा सुरू केल्या आहेत. भारतासाठी हा मुद्दा आगामी काळात महत्त्वाचा ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com