Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी 70 देशांवर लागू केला नवा टॅरिफ
(Donald Trump) डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणात मोठा बदल करत 70 हून अधिक देशांवरील आयातीवर 'परस्पर टॅरिफ' (Reciprocal Tariff) लागू करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय 7 ऑगस्ट 2025 पासून अंमलात येणार आहे. नवीन दरांनुसार 10% ते 41% दरम्यान आयात कर आकारले जातील.
ट्रम्प यांनी म्हटले होते की, “1 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. ती कायम आहे, ती वाढवली जाणार नाही. अमेरिकेसाठी हा एक मोठा दिवस आहे. जुलैच्या सुरुवातीस, 1 ऑगस्ट ही सुधारित अंतिम तारीख जाहीर करताना ट्रम्प यांनी नमूद केले होते की,“ही तारीख ठरलेली आहे, पण 100% अंतिम नाही.”
या तारखेच्या आधीच ट्रम्प प्रशासनाने विविध देशांना अधिकृत पत्रव्यवहार करून त्यांच्या देशातील आयात वस्तूंवरील नव्या टॅरिफ दरांची माहिती दिली होती, जी बहुतांशप्रमाणे 2 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या प्रारंभिक दरांशी सुसंगत होती.
एप्रिलच्या सुरुवातीस ट्रम्प यांनी अमेरिकेने जवळपास सर्व देशांवरील आयातीवर एकसंध 10% कर लावण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी काही देशांवर 50% पर्यंत टॅरिफ लागू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
प्रमुख देशांवरील टॅरिफ दर (2025):
सीरिया 41%
म्यानमार 40%
लाओस 40%
स्वित्झर्लंड 39%
इराक 35%
सर्बिया 35%
दक्षिण आफ्रिका 30%
लिबिया 30%
भारत 25%
ट्युनिशिया 25%
बांगलादेश 20%
श्रीलंका 20%
तैवान 20%
व्हिएतनाम 20%
पाकिस्तान 19%
थायलंड 19%
फिलिपाइन्स 19%
निकाराग्वा 18%
नायजेरिया 15%
दक्षिण कोरिया 15%
न्यूझीलंड 15%
नॉर्वे 15%
टर्की 15%
युनायटेड किंगडम 10%