Donald Trump Vs Elon Musk : एलन मस्क वेगळा पक्ष स्थापन करणार ?

मस्कचे राजकीय पाऊल: अमेरिकेत नवीन पक्ष स्थापन करण्याची शक्यता
Published by :
Shamal Sawant

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीत दरी आलेली दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद सुरु आहे. हा वाद मस्क यांच्या वन बिग ब्युटीफूल या ट्रम्प यांच्या विधेयकावर टीका केल्यानंतर हा वाद प्रचंड वाढला आहे. दरम्यान आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. टेस्लाचे सीईओ नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचे म्हटले जात आहे.

मस्क यांनी पार्टी आयोजित करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले नसले तरी, त्यांनी एकामागून एक अशा अनेक पोस्ट केल्या आहेत, ज्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे. मस्कने एक्सवरील एका पोलद्वारे विचारले की अमेरिकेत नवीन राजकीय पक्षाची गरज आहे का? मस्क म्हणतात की या पोलमध्ये 80 टक्के वापरकर्त्यांनी 'होय' असे उत्तर दिले. त्यामुळे आता खरच एलन मस्क नवीन पक्ष स्थापन करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागेल आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com