देश-विदेश
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला पुन्हा मोठा धक्का, हार्वर्डमध्ये विदेशी मुलांना नो एन्ट्री
डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला पुन्हा मोठा धक्का, हार्वर्डमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश बंद.
हार्वर्ड विद्यापीठाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट आव्हान दिलं आहे. हार्वर्ड विद्यापीठ प्रशासनाने ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात खटला दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची पात्रता ठेवणाऱ्या अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाचे प्रमाणपत्र ट्रम्प प्रशासनाने 23 मे ला रद्द केलं आहे.
यामुळे हार्वर्डला 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी नवीन परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. सध्या विद्यापीठात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना इतर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेत शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार आहे.