देश-विदेश
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानला पुन्हा भूकंपाचा धक्का; तीव्रता 4.2 रिश्टर स्केल
अफगाणिस्तानला पुन्हा भूकंपाचा धक्का बसला आहे.
(Afghanistan Earthquake) अफगाणिस्तानला पुन्हा भूकंपाचा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानात 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला असून गेल्या चार दिवसांत देशात सलग चौथा भूकंप झाला असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 8:54 वाजता हा भूकंप झाला.
यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली 140 किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितले जाते.