Delhi Earthquake
देश-विदेश
Delhi Earthquake : दिल्लीत भूकंपाचे मोठे धक्के; तीव्रता 4.4 रिश्टर स्केल
दिल्लीत भूकंपाचे मोठे धक्के बसले आहेत.
(Delhi Earthquake ) दिल्लीत भूकंपाचे मोठे धक्के बसले आहेत. 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप असल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली, नोएडा, गाझियाबादमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे.
भूकंपाचे केंद्र हरियाणातील झज्जर असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे 10 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील भागातही भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे.