China Earthquake: चीन भूकंपाने हादरला! तीव्रता 4.5 रिश्टर स्केल
(China Earthquake ) चीनमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. म्यानमारच्या सीमेपासून जवळ असलेल्या भागात हे भूकंपाचे केंद्र असल्यामुळे त्याचा प्रभाव चीनच्या दक्षिणेकडील भागातही जाणवला. भारताच्या राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्रानं (National Center for Seismology) यास दुजोरा दिला असून, भूकंप जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर झाला आहे.
सकाळी सुमारे 6:29 वाजता हा धक्का जाणवला असून भूकंपाचं केंद्र 25.05 अंश उत्तर अक्षांश आणि 99.72 अंश पूर्व रेखांशावर आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास या भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी अथवा मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती नाही.
मात्र, या परिसरात गेल्या काही दिवसांपासून हलक्या तीव्रतेचे धक्के जाणवत असल्यामुळे भविष्यात अधिक तीव्र भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याच भागात दोन महिने आधी म्यानमारमध्ये 7 रिश्टर तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला होता. त्यामध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या.