एलॉन मस्कची भारतात मोठी आर्थिक गुंतवणूक, SpaceX आणि Airtel मध्ये मोठा करार
सध्या डिजिटल युग वाढताना दिसत आहे. लोकाना तात्काळ सेवा देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नेहमीच प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे आता सगळ्यांनाच हाय स्पीड इंटरनेट मिळावे यासाठी सर्वच टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. आशातच आता भारती एअरटेलबद्दलची अपडेट समोर आली आहे. एअरटेल कंपनीचा स्पेसएक्स या अवकाश संशोधन करणाऱ्या कंपनीशी मोठा करार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारती एअरटेल आणि एलॉन मस्क यांच्या मालकीची स्पेसएक्स कंपनीमध्ये करार झाला आहे. या करारामध्ये भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरु करण्यात येणार आहे. याबद्दल 11 मार्च रोजी करारासंदर्भात एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. हा करार म्हणजे एलॉन मस्क यांची भारातील महत्त्वाची आर्थिक गुंतवणूक असल्याचे म्हंटले आहे. यानंतर आता मस्क भारतात अन्य क्षेत्रातही गुंतवणूक करण्याची शक्यता आहे असे म्हंटले जात आहे. या कराराच्या मदतीने एअरटेल आगामी काळात देशभरात विशेषत: ज्या भागात त्यांची सेवा पोहोचलेली नाही, तेथे स्वत:चा विस्तार करण्यावर भर देण्याची शक्यता आहे.
स्टारलिंक या कंपनीद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सॅटेलाईट बेस्ड इंटरनेटमुळे एअरटेल या कंपनीला विस्ताराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हा विस्तार नेमका कसा होणार? याची सध्यातरी कोणताही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. याबाबत आगामी काळात चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.