पोप फ्रान्सिस यांचे निधन ; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पोप फ्रान्सिस यांचे निधन ; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यांच्या मृत्यूने जगभरातील कॅथलिक दु;खात बुडाले आहेत.
Published by :
Shamal Sawant
Published on

युरोपमधील व्हॅटिकन येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोप फ्रांसिस यांचे निधन झाले आहे. त्यांचे निधन न्यूमोनियाने झाले असल्याचे समोर आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना रुग्णालयात भरती होते. मृत्यूसमयी ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूने जगभरातील कॅथलिक दु;खात बुडाले आहेत.

पोप फ्रान्सिस गेल्या आठवड्यापासून ब्राँकायटिसने ग्रस्त होते आणि शुक्रवारी, 14 फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु त्यांची प्रकृती बिघडली, पोपच्या श्वसनमार्गाच्या संसर्गावरील उपचार बदलावे लागले आणि नंतर एक्स-रेने त्यांना दुहेरी न्यूमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोप फ्रान्सिस गेल्या आठवड्यात त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये कॅथोलिक चर्चच्या जयंती वर्षाच्या उत्सवासाठी पारंपारिक रविवारच्या प्रार्थना आणि सामूहिक प्रार्थनांचे नेतृत्व करू शकले नाहीत. त्यांच्या प्रकृतीमुळे, त्यांचे पूर्वीचे अनेक नियोजित कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले. डॉक्टरांनी 88 वर्षीय पोपला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. 'श्वास घेण्यास त्रास होत असल्याने' त्यांची प्रकृती आणखी बिकट झाल्याची माहिती व्हॅटिकनने शनिवारी संध्याकाळी दिली.

मृत्यूची घोषणा कोणी केली?

रिपोर्टनुसार, पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची घोषणा व्हॅटिकनचे कॅमरलेंगो कार्डिनल केविन फॅरेल यांनी केली. कॅमरलेंगो कार्डिनल हे वॅटकिन शहरातील एक प्रशासकीय पद आहे, ज्यावर शहरातील तिजोरीची देखरेख आणि प्रशासकीय कामाची देखरेख करण्याची जबाबदारी आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com