Elon Musk
Elon Musk

Elon Musk: तुम्ही शाळेत गेला नसाल, मोठ्या कंपनीत काम केलं नसेल तरी मस्क देणार नोकरी

इलॉन मस्क यांनी सॉफ्टवेअर अभियंत्यांसाठी नोकरीची संधी आणली आहे. शाळेत गेलात किंवा नाही याची पर्वा न करता; तुम्हाला फक्त कोडिंग कौशल्य दाखवायचं आहे.
Published by :
Published on

अमेरिकेतील सुप्रसिद्ध उद्योजक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेत आहे. इलॉन मस्क यांनी केलेल्या ट्विटनंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मक्स यांनी जगभरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना नोकरीसाठी आवाहन केलं आहे. मात्र, त्यासाठी एक अट घातली आहे.

काय म्हणाले इलॉन मस्क?

इलॉन मस्क यांच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये त्यांनी हे आवाहन केलं आहे. मस्क म्हणाले “तुम्ही हार्डकोर सॉफ्टवेअर अभियंता असल्यास आणि Everything App तयार करू इच्छित असल्यास, कृपया तुमचे सर्वोत्तम काम code@x.com वर पाठवून आमच्यासोबत सहभागी व्हा, तुम्ही कुठे शाळेत गेलात किंवा शाळेत गेले नसाल तरी चालेल. कोणत्या मोठ्या कंपनीत काम केले आहे किंवा नाही याची आम्हाला पर्वा नाही. फक्त आम्हाला तुमचं कोडिंग कौशल्य दाखवा.”

काय आहे Everything App?

इलॉन मस्क यांना 'एक्स' या प्लॅटफॉर्मला केवळ सोशल नेटवर्किंगपुरतं मर्यादित ठेवायचं नाही. एक्स प्लॅटफॉर्मला मल्टी-फंक्शनल प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित करण्याचा मानस मस्क यांनी व्यक्त केला आहे. एव्हरीथिंग ॲप मार्फत पेमेंट, मेसेजिंग, ई-कॉमर्स आणि यांसारख्या सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. जे चीनच्या WeChat या अॅपप्रमाणे सर्वसमावेशक, वन-स्टॉप सोल्यूशन असेल.

'एक्स'चे विस्तारीकरण

एक्स प्लॅटफॉर्मच्या सीईओ लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) यांनी अलीकडेच याबाबत घोषणा केली आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर 2025 पर्यंत स्ट्रीमिंग आणि वित्तीय सेवा सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. लिंडा यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये, X Money आणि X TV सादर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एक्स प्लॅटफॉर्मचा सोशल मीडिया परस्परसंवादाच्या पलीकडे विस्तार करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. Yaccarino ने Grok, X चा AI चॅटबॉट, 2025 साठी सेट केलेल्या अपग्रेडच्या योजना देखील शेअर केल्या.

इलॉन मस्क यांची एक्सवरील पोस्ट पाहा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com