अँटिलिया स्फोटकं प्रकरण : प्रदीप शर्मा यांना निर्दोष मुक्त करण्यास न्यायालयाचा नकार
मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅंटीलिया बंगल्याबाहेर स्फोटकं आढळली होती. या प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी आढळले होते. मात्र आता या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना दोषमुक्त करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला. 20 जिलेटिन स्टिक असलेली बॅग स्कॉर्पिओ या गाडीमध्ये अँटिलियाबाहेर आढळली होती. 25 फेब्रुवारी 2021 रोजी अँटिलियाजवळ पार्क होती. ही गाडी बेवारस अवस्थेत असलेली बघायला मिळाली. नंतर या गाडीचा मालक मानसुख हिरेनची हत्यादेखील करण्यात आली होती. मनसुखचा मृतदेह मुंबऱ्यातील खाडीमध्ये सापडला होता.
मनसुखची हत्या सचिन वझे यांनी केल्याचा आरोप मनसुखच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणातीमध्ये सचिन वझे व प्रदीप शर्मा यांच्यासह काही जणांना अटक करण्यात आले होते. या प्रकरणी कोर्टात सुनावणी पार पडली असून या स्फोटकं प्रकरणात कोर्टाने आज (15 फेब्रुवारी) मोठा निर्णय दिला आहे.