Covid 19
Covid 19

Covid 19: कोरोनामुळे 'या' पाच देशांमधील प्रवासाबाबत तज्ज्ञांनी दिला इशारा

कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

( Covid 19 ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे. चीन, सिंगापूर, तैवान, अमेरिका या देशांमध्येसुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

कोरोनाच्या या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात असून या देशांमध्ये प्रवास करणे टाळा असा सल्ला पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात असल्याची माहिती मिळत आहे.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आता ही संख्या 3,395 इतकी वाढली आहे. महाराष्ट्रात 485 आणि दिल्लीत 436 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिका या देशांचा यामध्ये समावेश असून या ठिकाणी प्रवास करणे टाळावे, मास्क आणि सामाजिक अंतर ठेवावे आणि हात स्वच्छ धुवावे या सर्व गोष्टींचे पालन करण्यास सांगण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com