Israel Vs Hamas War
Israel Vs Hamas War

अखेर १५ महिन्यांपासून धुमसत असलेल्या इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम

इस्रायल आणि हमासमध्ये 19 जानेवारीपासून युद्धविराम लागू होणार आहे. 15 महिन्यांच्या संघर्षानंतर हा करार इजिप्त, कतार आणि अमेरिकेच्या मध्यस्थीनं झाला आहे.
Published by :
Published on

युद्धाच्या आगीत होरपळणाऱ्या इस्रायल आणि पॅलेस्टिनमधून एक दिलासादायक बातमी आलेली आहे. गाझामध्ये युद्धबंदीबाबत इस्रायल आणि हमास यांच्यात करार झाला आहे. 19 जानेवारीपासून हा युद्धविराम लागू होणार आहे. दोघांमधील करारानंतर 15 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध आता तात्पुरतं थांबणार आहे.

इजिप्त, कतार आणि अमेरिका यांच्या मध्यस्थीनं हा करार झाला आहे. युद्धविराम तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात हमास 33 इस्रायली ओलिसांची सुटका करेल तर इस्रायल पॅलेस्टिनी ओलिसांचीही सुटका करेल. हा युद्धविराम 42 दिवसांसाठी असणार आहे. युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत दोन्ही बाजूंच्या लष्करी कारवाया थांबवल्या जातील. त्यामुळे गाझा पट्टीतून इस्रायली सैन्य पूर्णपणे माघार घेणार आहे. तिसऱ्या टप्प्यांतर्गत दोन्ही बाजूंच्या नागरिकांचे मृतदेह एकमेकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.

इस्रायल आणि हमास युद्धविरामाचं स्वरूप काय?

युद्धबंदीच्या पहिल्याच दिवशी रविवारी तीन महिला इस्रायली ओलिसांची सुटका केली जाईल. युद्धबंदीच्या सातव्या दिवशी हमास आणखी चार इस्रायली ओलीस सोडणार आहे. अशा प्रकारे हमास दर सात दिवसांनी तीन इस्रायली ओलीसांची सुटका करेल.

युद्धबंदीच्या सहाव्या आठवड्यात हमास उर्वरित ओलीसांचीही सुटका करेल. त्या बदल्यात इस्रायल आपल्या तुरुंगात बंदिस्त पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल. हमासने नेतन्याहू सरकारला सोडण्यात येणाऱ्या पॅलेस्टिनी कैद्यांची यादी सादर केली आहे.

युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत दोन्ही बाजूंच्या लष्करी कारवाया कायमस्वरूपी थांबवल्या जातील. त्यामुळे गाझा पट्टीतून इस्रायली सैन्य पूर्णपणे माघार घेणार आहे. तिसऱ्या टप्प्यांतर्गत दोन्ही बाजूंच्या मृत नागरिकांचे मृतदेह एकमेकांच्या ताब्यात दिले जातील.

इस्रायल आणि हमास यांच्यातील हे युद्ध 7 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू झाले, जेव्हा हमासच्या सैनिकांनी दक्षिण इस्रायलवर हल्ला केला, 1200 लोक मारले आणि 250 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले. प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलने एक लष्करी मोहीम सुरू केली, ज्यामध्ये गाझा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, 46,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले.

इजिप्त आणि कतारसोबत अमेरिकेने केलेल्या अनेक महिन्यांच्या मुत्सद्देगिरीनंतर इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम आणि ओलीस करार झाला आहे. हा करार गाझामधील लढाई थांबवेल, पॅलेस्टिनी नागरिकांना अत्यंत आवश्यक असलेली मानवतावादी मदत प्रदान करेल आणि 15 महिन्यांहून अधिक काळ बंदिवासात राहिल्यानंतर ओलीसांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा भेट घडवून आणेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com