USA South Carolina Firing
देश-विदेश
USA South Carolina Firing : अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनातील बारमध्ये गोळीबार; 4 जणांचा मृत्यू
गोळीबाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ
थोडक्यात
अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनातील बारमध्ये गोळीबार
4 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी
गोळीबाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ
(USA South Carolina Firing) अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनातील बारमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटे सेंट हेलेना येथील विलीज बार अँड ग्रिल येथे हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू आणि 20 जण जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गोळीबाराच्यावेळी बारमध्ये मोठी गर्दी जमली असून मृत्यू आणि जखमींच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते असे सांगण्यात आले आहे.