Yusuf Pathan : 'त्या' यादीतून युसूफ पठाण बाहेर, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
भारत - पाकिस्तान तणावादरम्यान भारताने अनेक देशांमध्ये खासदारांचं शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला असून यात भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षातील खासदारांचाही समावेश आहे. परदेशात पाठवल्या जाणाऱ्या यादीत माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण याचं देखील नाव होत.
युसूफ पठाण वडोदरा जिल्ह्यातील असून तृणमूल काँग्रेसचे गुजरातमधील खासदार आहेत. त्यांनी बंगालच्या बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांचा 85 हजार मतांनी पराभव करत, तृणमूल काँग्रेस पक्षाकडून निवडणूक जिंकली होती. मात्र आता युसूफ पठाणसोबत तृणमूल पक्षातील इतर कोणताही खासदार या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग असणार नसल्याच, ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने सांगितल.
केंद्र सरकारने ७ सर्वपक्षीय टीम वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर पाठवण्याची घोषणा केली. यादरम्यान टीम ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती सर्व देशांत देईल आणि पाकिस्तानच्या दहशतवादाचाही पर्दाफाश केला जाईल. यात एकूण 51 नेत्यांना परदेशात पाठवले जाणार असून ते शिष्टमंडळ 32 देशांसह ब्रुसेल्समधील युरोपियन युनियन मुख्यालयाला देखील भेट देतील.
तसेच प्रत्येक गटात 7 ते 8 नेते असणार असून यात माजी राजदूतही त्यांच्यासोबत असणार आहेत. या यादीत भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, जेडीयूचे संजय कुमार, द्रमुकच्या कनिमोझी, राष्ट्रवादी (शरद पवार) सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे.