Gautam Gambhir and Ms Dhoni Viral Image : क्रिडाविश्वातून महत्त्वाची बातमी! धोनी- गंभीर एकत्र, नेमकं प्रकरण काय?
Gautam Gambhir and Ms Dhoni Viral Image : काही रियुनियनची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. अनेक वर्षांनी काही दिग्गज एकत्र दिसले की क्रिकेटप्रेमींसाठी तो खास क्षण ठरतो. असाच क्षण नुकताच पाहायला मिळाला, जेव्हा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि भारताचा आक्रमक सलामीवीर गौतम गंभीर एका कार्यक्रमात एकत्र दिसले.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या भावाचा उत्कर्ष संघवी यांचा विवाह सोहळा अत्यंत भव्यदिव्य पार पडला. या लग्नात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र, धोनी आणि गंभीरच्या एकत्र उपस्थितीनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. धोनी आपल्या पत्नी साक्षीसोबत या सोहळ्यात आला होता. सोशल मीडियावर धोनी आणि गंभीरचे एकत्र फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले.
गंभीर नेहमीच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. त्याची काही जुनी विधाने अशी मांडली गेली होती की जणू तो धोनीविरोधात बोलतो. त्यामुळे त्यांच्या नात्याबाबत चर्चाही रंगल्या होत्या. परंतु या रियुनियनमुळे दोघांच्या समीकरणा बद्दल नवा संदेश गेला आहे.
या विवाह सोहळ्यात फक्त धोनी-गंभीरच नव्हे तर रोहित शर्मा, हरभजन सिंग, इरफान पठाण, पार्थिव पटेल आणि तिलक वर्मा यांच्यासह अनेक क्रिकेटपटू उपस्थित होते. त्याचबरोबर सुनील शेट्टी, कृती सॅनन आणि वरुण शर्मा यांसारखे बॉलिवूड स्टार्सही या सोहळ्यात सहभागी झाले. उत्कर्ष संघवीचा विवाह ध्वनी कानुंगोशी झाला. धोनी-गंभीरच्या या पुनर्मिलनाने क्रिकेटप्रेमींना जुने सुवर्णक्षण पुन्हा आठवले.