Ghibli इमेजचा मोह महागात पडू शकतो! एक क्लिक आणि तुमचं...
Ghibli अॅनिमेशन स्टाईलची क्रेझ सध्या सोशल मीडियावर गगनाला भिडली आहे. आपला चेहरा Ghibli पात्रांसारखा दिसावा, हे कोणाला नको असतं? पण या व्हिज्युअल आकर्षणामागे लपलेला सायबर धोका अनेकांना माहित नाही आणि याच अज्ञानाचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. Ghibli स्टाईल फोटो तयार करताना जर चुकीच्या वेबसाईटवर चेहरा अपलोड केला, तर तुमचं डिजिटल अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं, असा तज्ज्ञांचा इशारा स्पष्ट आहे
Ghibli फोटोमागे लपलेलं सायबर जाळं
ChatGPT किंवा अधिकृत प्लॅटफॉर्म्सशिवाय अनेक थर्ड पार्टी वेबसाइट्स आणि अॅप्स Ghibli फोटो जनरेशनच्या नावाखाली युजर्सचे फेस डिटेल्स गोळा करत आहेत. हे डिटेल्स स्कॅमरकडे गेल्यास, ते फेस रेकग्निशनचा गैरवापर करून स्मार्टफोन अनलॉक करू शकतात, सोशल मीडिया अॅक्सेस मिळवू शकतात आणि अगदी UPI पिनद्वारे आर्थिक फसवणूकही करू शकतात.
फसवणुकीची नवीन पद्धत — बनावट वेबसाइट्स
सायबर गुन्हेगार आता सुप्रसिद्ध वेबसाइट्ससारखेच फसवे डोमेन नेम तयार करत आहेत. यामध्ये युजर्सना "फ्री सेवा", "स्वस्त प्लॅन" अशा गोडगोड प्रस्तावांनी आकर्षित केलं जातं. एकदा चेहरा किंवा इतर माहिती अपलोड केली की, ती तुमच्याच विरोधात वापरली जाते.
तुमच्या चेहऱ्याचं काय?
हा धोका फक्त Ghibli पुरता मर्यादित नाही. चेहऱ्याच्या आधारे ओळख पटवणाऱ्या (Face Recognition) यंत्रणांमध्ये ही माहिती वापरून अनधिकृत प्रवेश मिळवला जाऊ शकतो. बँकिंग अॅप्स, डिजिटल वॉलेट्स, सोशल मीडिया – तुमच्या सगळ्या डिजिटल मालकीवर गदा येऊ शकते.
काय करावं?
फक्त अधिकृत, विश्वासार्ह वेबसाइट्सच वापरा.
"Free" किंवा "Premium" च्या नावाखाली तुमचं डाटाच चोरीला जात नाही ना, हे बघा.
वेबसाईट्सचा URL काळजीपूर्वक तपासा — कुठे तरी एखादा "i" च्या जागी "l", किंवा ".com" च्या ऐवजी ".cc" अशा बारीक चुकीचा वापर केला जातो.
चेहरा, बायोमेट्रिक डेटा, फोन नंबर इत्यादी कधीही थर्ड पार्टीला सहज देऊ नका.
सावध व्हा — सौंदर्याच्या नादात गोपनीयतेचा बळी जाऊ नये
टेक्नोलॉजीचा उपयोग आनंदासाठी व्हावा, धोका निर्माण करण्यासाठी नव्हे. Ghibli स्टाईल फोटो तयार करताना एक छोटीशी सावधगिरी तुम्हाला मोठ्या फसवणुकीपासून वाचवू शकते. इंटरनेटवर काय शेअर करता आहात, याची जबाबदारी तुमच्यावर आहे.