Global Peace Index 2025 : जगातील सर्वात सुरक्षित आणि धोकादायक देशांची यादी समोर, पाहा भारत कितव्या स्थानावर?
(Global Peace Index 2025 ) जगभरात युद्धजन्य वातावरण अधिक तीव्र होत चालली असून, यातच ग्लोबल पीस इंडेक्स 2025 च्या अहवालानुसार, जगातील अनेक भागांमध्ये संघर्ष व अस्थिरतेचे प्रमाण वाढत आहे. मध्य पूर्वेतील इस्रायल-गाझा संघर्ष आता थेट इराणपर्यंत पोहोचला आहे. त्याचबरोबर रशिया आणि युक्रेन यांच्यातील दीर्घकालीन युद्धही अजून संपलेले नाही.
सुरक्षित देशांची यादी
ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणून आइसलँडला सलग 17 व्या वर्षी अव्वल स्थान मिळाले आहे. यादीत युरोपमधील आठ देशांचा समावेश असून, फक्त एकच आशियाई देश – सिंगापूर – सहाव्या क्रमांकावर आहे.
टॉप 10 यादी पुढीलप्रमाणे आहे:
1. आइसलँड
2. आयर्लंड
3. न्यूझीलंड
4. ऑस्ट्रिया
5. स्वित्झर्लंड
6. सिंगापूर
7. पोर्तुगाल
8. डेन्मार्क
9. स्लोव्हेनिया
10. फिनलंड
असुरक्षित देश
जगातील सर्वात असुरक्षित देशांच्या यादीत रशियाला 163 वं स्थान देण्यात आले असून, युक्रेन, सुदान, येमेन, अफगाणिस्तान, सीरिया यांसारख्या देशांचा समावेशही या यादीत आहे
10 देश पुढीलप्रमाणे:
1. रशिया
2. युक्रेन
3. सुदान
4. कांगो (डीआरसी)
5. येमेन
6. अफगाणिस्तान
7. सीरिया
8. दक्षिण सुदान
9. इस्रायल
10. माली
भारताचा क्रमांक यंदाही 115 वा आहे. मागील वर्षी देखील हीच रँकिंग होती. पाकिस्तानने 144 वे स्थान मिळवले आहे. तुर्कीची स्थिती मात्र अधिक खराब असून तो 146 व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल पीस इंडेक्स हा "Institute for Economics and Peace" (IEP) या संस्थेद्वारे दरवर्षी प्रसिद्ध केला जातो.