Missile Attack: मोठा संकट! व्हेनेझुएलावर कारवाईनंतर उत्तर कोरियाचा मिसाईल हल्ला, जगभरात वाढली चिंता
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
अमेरिकेने शनिवारी व्हेनेझुएलावर हल्ला करून राष्ट्रपती निकोलास मादुरो यांना अटक केल्यानंतर अवघ्या काही तासांत उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर मिसाईल हल्ला केला आहे. रविवारी झालेल्या या भीषण हल्ल्यामुळे आशियाई उपखंडात तणाव चरमसीमेला पोहोचला असून, जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण आहे.
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी दक्षिण कोरियाच्या दिशेने अनेक मिसाइल डागल्या असून, त्यांनी मिसाइल उत्पादन दुपटीने वाढवण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली असून, अण्वस्त्र कार्यक्रमावर चर्चा व्हावी हा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे-म्युंग हे चीन दौऱ्यावर असतानाच हा हल्ला झाला.
दक्षिण कोरियाने तात्काळ अपतकालीन बैठक बोलावली असून, देशभर हालचालींना वेग आला आहे. जपान आणि दक्षिण कोरियाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेच्या व्हेनेझुएला कारवाईनंतर उत्तर कोरियाच्या या आक्रमक भूमिकेमुळे जगासमोर नवे संकट उभे राहिले आहे.
• अमेरिका व्हेनेझुएलावर कारवाई करून मादुरो अटक केली
• उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर मिसाईल हल्ला केला
• किम जोंग-उनने मिसाईल उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले
• आशियात तणाव वाढला, जागतिक चिंता प्रकट
