"फुकट्या योजना सरकार बंद करणार..." सामनामधून मोदी सरकारवर कडाडून टीका

सामनामधून मोदी सरकारवर घणाघाती टीका
Published by :
Team Lokshahi

सामना वृत्तपत्रातून केंद्रसरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. केंद्र सरकार हे न्यायालयाच्या मदतीने फुकट्या सरकारी योजना बंद करणार असल्याची टीका करण्यात आली आहे. एकेकाळी रेवड्याचे वाटप अरविंद केजरीवालांवर करण्यात आले. मात्र याच रेवडी वाटपावरुन त्यांनी राजकारण करत असल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कान टोचून त्याकडे लक्ष वेधले आहे. सोनाराने कान टोचले आणि लोहराने हातोडा मारला तरीही केंद्र सरकार आपल्या मस्तीतच असल्याचे म्हणत सामनामधून टीका करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com