Liquor News : सरकारचा मोठा निर्णय ; मद्यप्रेमींच्या खिशाला फटका
देशातील मद्यप्रेमींसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशी मद्यासह विदेशी मद्याच्या दरात वाढ झाली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर ( IMFL) तब्बल दिड टक्याने वाढ झाली असून देशातील तळीरामांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14 हजार कोटींचा अतिरिक्त महसूल गोळा होणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही दरवाढ जाहीर केली आहे . देशी मद्य 80 रुपये, महाराष्ट्र मेड लिकर 148 रुपये, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य 205 रुपये तर, विदेशी मद्याचे प्रिमीयम ब्रॅण्डची किंमत 360 रुपये इतकी झाली आहे. मंत्रीमंडळाकडून उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे महाराष्ट्रामधील दारूच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे आता हॉटेलमध्ये ही इतर दुकानासारखी मद्याची विक्री करता येणार आहे. कराराद्वारे भाडेतत्त्वावरती विदेशी दारू विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.
या विभागाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने हा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात 1223 पदे नव्याने भरले जाणार आहेत. त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. अश्या उपाययोजना राबवल्यानंतर सरकारच्या गल्ल्यामध्ये दरवर्षी सुमारे 14 हजार कोटींची महसूल वाढ अपेक्षित आहे.त्यामुळे आता मद्यप्रेमींना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.