Gujarat Bridge Collapse
Gujarat Bridge Collapse

Gujarat Bridge Collapse : गुजरातमध्ये आनंद - वडोदरा जिल्ह्याला जोडणारा पूल कोसळला

गुजरातमध्ये आनंद आणि वडोदरा जिल्ह्याला जोडणारा गंभीरा पूल आज सकाळी अचानक कोसळल्याची घटना घडली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Gujarat Bridge Collapse ) गुजरातमध्ये आनंद आणि वडोदरा जिल्ह्याला जोडणारा गंभीरा पूल आज सकाळी अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये ब्रिजचे दोन तुकडे झाले असून अनेक वाहने नदीमध्ये वाहून गेली असून यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून 3 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे.

मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या पुलाची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गुजरातमध्ये सध्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य तातडीने सुरू झाले आहे. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून वाहतूक दुसऱ्या मार्गाकडे वळविण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com