Air India Flight Accident : उड्डाणानंतर विमान काही मिनिटांतच कोसळले; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
गुजरातमधील अहमदाबादमधून एक मोठी बातमी येत आहे. येथे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, अपघातस्थळावरून आकाशात धुराचे लोटदेखील बघायला मिळाले. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. पण विमानाचा हा अपघात कसा झाला ? याचा घटनाक्रम काय होता? याबद्दल आपण जाणून घेऊया.
दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी - बोर्डिंग पूर्ण, टेकऑफची तयारी
एअर इंडियाचे विमान एआय-171 अहमदाबादहून लंडनला जाणार होते. सर्व 242 प्रवासी चढले होते आणि विमान धावपट्टीवर टेकऑफसाठी सज्ज.
दुपारी 1 वाजून 17 मिनिटांनी – टेकऑफ
विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केले. सुरुवातीचे काही मिनिटे उड्डाण सामान्य होते.
दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी - विमान दुर्घटना
उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमानात बिघाड झाला आणि मोठी दुर्घटना घडली.
विमानात एकूण किती जण होते ?
विमानात एकूण 242 लोक होते, ज्यात 230 प्रौढ, 2 मुले आणि 12 क्रू मेंबर्सहोते. अपघाताच्या वेळी विमान पायलट-इन-कमांड सुमित सभरवाल आणि को-पायलट क्लाइव्ह कुंदर यांच्या हातात होते.