ऐकावं ते नवलच ! पठ्ठ्याचं प्रेम आणि गर्लफ्रेंड चक्क ट्रॉली बॅगमधून बॉइज हॉस्टेलमध्ये , Video Viral
हरियाणातील सोनीपत येथील ओ.पी. जिंदाल विद्यापीठातील एका अनोख्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एका विद्यार्थ्याने आपल्या प्रेयसीला गुप्तपणे मुलांच्या वसतिगृहात आणण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली. मुलांच्या वसतिगृहात मुलींना प्रवेश करण्यास सक्त मनाई असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण मुलांच्या वसतीगृहामध्ये राहणारा एक मुलगा प्रेमात इतका बुडाला की त्याने आपल्या प्रेयसीला चक्क सुटकेसमधून घेऊन येण्याचा पर्याय अवलंबला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, जेव्हा मुलगा त्याच्या प्रियसीला सुटकेसमध्ये लपवून घेऊन येत होता तेव्हा मुलगी अचानक ओरडली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांना संशय आला. त्यांनी ताबडतोब सुटकेस तपासली आणि त्या मुलाचे रहस्य उघड झाले. जेव्हा सुटकेस उघडली तेव्हा त्यात सामानाऐवजी एक मुलगी आढळली. हे पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. त्याने लगेच मुलीला सुटकेसमधून बाहेर काढले.हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.