गृहमंत्री अमित शहा कोईम्बतूर येथील सद्गुरूंच्या ईशा योग केंद्रात महाशिवरात्री सोहळ्याला उपस्थित राहणार

गृहमंत्री अमित शहा कोईम्बतूर येथील सद्गुरूंच्या ईशा योग केंद्रात महाशिवरात्री सोहळ्याला उपस्थित राहणार

ईशा योग केंद्रात महाशिवरात्री सोहळ्याचे आयोजन
Published by :
Team Lokshahi
Published on

केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह हे आज संध्याकाळी ईशा योग केंद्रात आदियोगी आणि सद्गुरुंच्या उपस्थितीत ईशा फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या महाशिवरात्री सोहळ्यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. रात्री 6 वाजता सुरू होणारा हा सोहळा 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता संपणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबद्दल सद्गुरू यांनी ट्विट करत लिहिले की, "आमच्यासोबत #महाशिवरात्री साजरी करण्यासाठी माननीय गृहमंत्री श्री अमित शहा यांचे स्वागत करणे हा आमचा बहुमान आहे. त्यांनी राष्ट्राप्रती केलेल्या सेवांबद्दल कृतज्ञता आणि या सभ्यतेमध्ये सर्वात मोठे आध्यात्मिक महत्त्व असलेल्या या दिवशी आमच्यात सामील होणार असल्याचा आनंद आहे".

सद्गुरु, प्रथमच मध्यरात्री महामंत्र (ओम नमः शिवाय) दीक्षा देत आहेत. सद्गुरु यांनी एक एक विनामूल्य 'मिरॅकल ऑफ माइंड' ध्यान ॲपचे देखील अनावरण करतील. यामध्ये ज्यात सद्गुरुंसोबत 7 मिनिटांचे मार्गदर्शित ध्यान आहे. ज्याचा उद्देश लोकांना एक सुलभ दैनंदिन ध्यान दिनचर्या स्थापित करण्यासाठी सक्षम करणे आहे.

प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल, प्रख्यात गुजराती लोकगायक मुक्तिदान गढवी, लोकप्रिय रॅपर पॅराडॉक्स आणि कॅसमे, 21 वर्षीय दृष्टिहीन संगीतकार या कार्यक्रमात सादरीकरण करतील. रात्री पुणेरी ढोल, पंजाबी ढोल, आणि तामिळनाडू ढोल वादकांसह बहु-प्रादेशिक ढोल वादक, साउंड्स ऑफ ईशा आणि ईशा संस्कृती यांच्या सादरीकरणासह देखील सादर केले जातील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com