देश-विदेश
भारताच्या कारवाईची पाकिस्तानला धास्ती; जनतेला दोन महिन्यांचं रेशन साठवण्याचे निर्देश
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तानने धास्ती घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाने सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना दोन महिन्यांसाठी अन्नसाठा साठवण्याचे आवाहन केले आहे. पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी विधानसभेत सांगितले की. 13 मतदारसंघांमध्ये दोन महिन्यांसाठी अन्नसाठा साठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.