देश-विदेश
Asaduddin Owaisi On Pakistan : "अधिकृत भिकारी...", असदुद्दीन ओवेसी यांचा कर्ज घेणाऱ्या पाकिस्तानवर निशाणा
देशासाठीच्या कार्यक्रमांवर पाकिस्तानवर टीका केली आणि पाकिस्तान हा 'अधिकृत भिकारी' असल्याचे म्हटले आहे.
एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बेलआउट पॅकेज आणि देशासाठीच्या कार्यक्रमांवर पाकिस्तानवर टीका केली आणि पाकिस्तान हा 'अधिकृत भिकारी' असल्याचे म्हटले आहे.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, " 'ये ऑफिशियल भीकमांगे है'. त्यांनी आयएमएफकडून 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले. आयएमएफ हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नाही; ते पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय दहशतवादी निधी देत आहेत. अमेरिका, जर्मनी आणि जपान यांनी हे कसे मान्य केले?... नेतृत्व सोडा पाकिस्तानला अर्थव्यवस्था कशी चालवायची? हे देखील माहित नाही. तुम्ही लोक तिथे बसून आम्हाला इस्लाम म्हणजे काय हे सांगत आहात, पण तुमच्याकडे फक्त येथील शांतता बिघडवण्यासाठी आणि हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी चुकीच्या धोरणांचा वापर आहे..." असे ओवेसी म्हणाले.