PM Narendra Modi : आज पंतप्रधान देशाला करणार संबोधित, 'Opreation Sindoor' वर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी निष्पाप हिंदू नागरिकांवर धर्म विचारून गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये 26 नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून भारतीय सेनेने बदला घेतला. भारताने केलेल्या या कारवाईमध्ये पाकिस्तानमध्ये असणाऱ्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र पाकिस्तानने भारताशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने भारतावर अनेकदा ड्रोन आणि मिसाईलने लक्ष्य केले. मात्र पाकिस्तानचे ही मनसुबे भारताने उधळून लावले.
भारताने तीनही दलांच्या मदतीने पाकिस्तानला जेरीस आणले होते. मात्र तरीही पाकिस्तानच्या कुरापती थांबत नव्हत्या. पाकिस्तानने अनेकदा LOC वर गोळीबार करत नागरिकांना लक्ष्य केले. मात्र भारताने याचे सडेतोड उत्तर दिले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय सेनेने पाकिस्तानवर अनेक यशस्वी कारवाया केल्या. या सगळ्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध ताणले गेले. सध्या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू झाली आहे.
मात्र आता पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असे भारतीय सेनेने स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता मोठी माहिती समोर येत आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे आता 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल मोदी काय बोलणार? याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.