Tata Group चा मोठा निर्णय ; अमेरिकेतील गाड्यांची निर्यात थांबवणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी काही देशांवर टॅरीफ लादण्याची घोषणा केली. भारतावरदेखील 26% टॅरीफ लादण्यात आले आहे. यावरुन आता टाटा कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुपची उपकंपनी जॅग्वार लँड रोव्हरने निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये बनवण्यात आलेल्या गाड्यांची अमेरिकेला होणारी निर्यात थांबवण्याचा निर्णय़ घेतला आहे. जॅग्वार लँड रोव्हर ही ब्रिटनमधील सर्वात मोठी कार निर्मिती करणारी कंपनी आहे.
जॅग्वार लँड रोव्हर कंपनीमुळे ब्रिटनमध्ये 38 हजार लोकांना रोजगार मिळतो. मात्र कंपनीच्या या निर्णयामुळे या लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. या कंपनीनं गेल्या दोन महिन्यापूर्वीच अमेरिकेला जी निर्यात करायची होती ती पूर्ण केली आहे.मार्च 2024 पासू गेल्या 12 महिन्यात 4,30,000 गाड्यांची विक्री केली आहे. यापैकी 25 टक्के गाड्यांची विक्री उत्तर अमेरिकेत करण्यात आली होती.
शेअरर्सवर परिणाम होण्याची शक्यता :
टाटा जेएलआरने अमेरिकेत आधीच दोन महिन्यांचा स्टॉक करून ठेवलेला आहे. यामुळे पुढील दोन महिने सहजच जुन्या कर प्रणालीवर निघून जाणार आहेत. ही वाहने नव्या ट्रम्प टॅरीफच्या प्रभावाखाली येत नाहीत. यामुळे कंपनीने विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका कंपनीला बसण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सचे शेअरही पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टॅरिफची घोषणा :
अमरिकेने तब्बल २६ टक्के समन्यायी व्यापारकर अर्थात Reciprocal Tarriff लागू केला आहे. अर्थात, भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर हा 26 टक्के कर लागू असेल. ट्रम्प यांच्या या निर्णयाचे अमेरिकन शेअर बाजारात तीव्र पडसाद उमटले तसेच भारतीय शेअर बाजारावरही त्याचा परिणाम दिसला.