America
America

America : अमेरिकेत आणखी एका भारतीयाची हत्या

पेट्रोल पंपावर भारतीयावर गोळीबार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • अमेरिकेत आणखी एका भारतीयाची हत्या

  • पेट्रोल पंपावर भारतीयावर गोळीबार

  • हल्लेखोर फरार, हैदराबादमध्ये कुटुंब संकटात

(America) अमेरिकेत आणखी एका भारतीयाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पेट्रोल पंपावर भारतीयावर गोळीबार करण्यात आला असून चंद्रशेखर पोल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अमेरिकेतील डलासमध्ये ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे.

तो पेट्रोल पंपावर काम करायचा 2023 मध्ये पुढील शिक्षणासाठी तो डलासला गेला होता. पेट्रोल पंपावर तो पार्ट टाइम करत होता. याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आणि यामध्ये त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर सध्या फरार आहे.

या घटनेमुळे घबराट उडाली आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्याने पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. लवकरात लवकर त्याचा मृतदेह तेलंगणातील त्याच्या गावी आणण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी, अशी मागणी भारत राष्ट्र समितीने केली आहे. एका महिन्यात ही तिसरी घटना आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com