"अदानी हा विषय व्यक्तिगत...", अमेरिका भेटीदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उत्तर

अमेरिकेमध्ये गौतम अदानी यांच्यावर असलेल्या खटल्याबद्दलच्या विचारलेल्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांचं उत्तर
Published by :
Team Lokshahi

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा चांगलाच चर्चेत राहिला आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी अमेरिका व भारत या दोन्ही देशांमध्ये संबंध अधिक दृढ होण्यासाठी काय करण्यात येईल यावर उपाययोजना करण्यात येणार याबद्दलची चर्चा झाली. यावेळी भारतातील श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले.

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली का? असे विचारण्यात आले. यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारत एक लोकशाही आहे आणि आपली संस्कृती वसुधैव कुटुंबकम' आहे. संपूर्ण जगच आमच्यासाठी कुटुंबं आहे. प्रत्येक भारतीय माझा आहे असं मला वाटतं. दोन देशांचे नेते कधीही वैयक्तिक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी भेटत नाहीत."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com