देश-विदेश
Russia Vs Ukraine War : रशिया Vs युक्रेन युद्ध थांबणार? पुतिन यांचा झेलेन्स्कींना प्रस्ताव
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाला तब्बल दोन वर्षे उलटून गेली आहेत. रशिया-युक्रेन संघर्षामुळे मोठ्या प्रमाणात जगभरातील अर्थव्यवस्थांना त्याचा फटका बसला आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मध्यस्थी केली होती.
अमेरिकेच्या प्रस्तावानंतर व्लादिमीर पुतिन यांनी सहमती दर्शवली होती. मात्र, काही अटी ठेवल्या होत्या. पण त्यांच्या अटी युक्रेनला मान्य न झाल्यामुळे हा तिढा सुटला नव्हता. दरम्यान, आता रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.