India Attack On Pak : भारताच्या हल्ल्यात पाकची उडाली दाणादाण; पंजाब प्रांतात लावली आणीबाणी

भारताने केलेल्या एअर स्ट्राईक हल्ल्यानंतर पंजाब प्रांतात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, लाहोर विमानतळावर 48 तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

पहलगाम मधील दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसंदर्भात अनेक कठोर पाऊले उचलताना पाहायला मिळाले आहेत. सुरुवातीला भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलं. एवढचं नाही तर 48 तासांमध्ये भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी रहिवाशांना भारतातून निघून जाण्यास भाग पाडले.

तर कालपासून मॉक ड्रिलच्या घोषणेने भारताने पाकिस्तानचं लक्ष विचलीत केले. तसेच भारताच्या वायुदलाच्या जवानांनी पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळ भिंबर, कोटली, सरजाल सियालकोट, मेहमूना जोया, मरकज् तैबा मुरीदके, मरकज् सुभान अल्लाह बहावलपूरसह 9 ठिकाणी दहशतवादी तळं उद्धवस्त केले. यानंतर पाकिस्तानात मोठी हालचाल झाली आहे.

पंजाब प्रांतात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, लाहोर विमानतळावर आपत्कालीन स्थिती लागू करून ते 48 तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. एवढचं नाही तर सियालकोट विमानतळही बंद करण्यात आला असून स्थानिक नागरिकांना प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com