Iran-Israel War : इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर किरणोत्सर्गाची गळती ? IAEA चा खुलासा
इराण-इस्रायल हल्ल्यामध्ये अमेरिकेने उडी घेत अमेरिकेने इराणवर हल्ले केले आहेत. रविवारी पहाटे अमेरिकेने आपल्या सहा बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सने इराणवर हल्ला केला. हा हल्ला इराणच्या तीन अणुस्थळांवर करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात की फोर्डो नष्ट झाले आहे. इराणच्या अणुस्थळांवर झालेल्या हल्ल्यांनंतर, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA)पहिल्यांदाच आपले मौन सोडले.
IAEA चे म्हणणे आहे की आतापर्यंत 'ऑफ-साइट रेडिएशन गळती' झाल्याचे वृत्त नाही. याचा अर्थ असा की आजूबाजूच्या भागात सध्या रेडिएशनचा धोका नाही. त्याचप्रमाणे, सौदी अरेबियाच्या अणु आणि रेडिओलॉजिकल नियामक आयोगानेही याची पुष्टी केली आहे. अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यानंतर कोणताही किरणोत्सर्गी गळती आढळून आलेली नाही, असे त्यात म्हटले आहे. मात्र या या हल्ल्यामुळे निर्माण झालेले प्रश्न अधिक चिंताजनक आहेत.
या हल्ल्याबद्दल इराणच्या अणुऊर्जा संघटनेने म्हटले की, त्यांच्या अणुस्थळांवर हल्ले करणे हे 'आंतरराष्ट्रीय कायद्याचे' उल्लंघन आहे. या हल्ल्यांमुळे किती नुकसान झाले आहे हे संघटनेने स्पष्ट केलेले नाही. इराणने स्पष्ट केले आहे की ते त्यांच्या 'राष्ट्रीय उद्योगाचे' काम थांबवणार नाही, जे देशाच्या अणु विकासासाठी खूप महत्वाचे आहे.
इराणच्या अणुऊर्जा संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे की, 'इराणची अणुऊर्जा संघटना इराणला आश्वासन देते की त्याच्या शत्रूंच्या कटांना न जुमानता, ते त्याच्या हजारो क्रांतिकारकांच्या, शास्त्रज्ञांच्या आणि तज्ञांच्या प्रयत्नांद्वारे या राष्ट्रीय उद्योगाचा विकास थांबवणार नाही.'