Iran-Israel War Video : लक्ष्य निश्चित, गोळीबार आणि इराणचे लढाऊ विमान F-14 अवघ्या 2 सेकंदात नष्ट , Video Viral

Iran-Israel War Video : लक्ष्य निश्चित, गोळीबार आणि इराणचे लढाऊ विमान F-14 अवघ्या 2 सेकंदात नष्ट , Video Viral

इराण-इस्रायल संघर्षाचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Published by :
Shamal Sawant
Published on

इराण आणि इस्रायलमधील युद्धादरम्यान, इस्रायली हवाई दलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये इराणी एफ-14 लढाऊ विमानाला अवघ्या 2 सेकंदात कसे लक्ष्य केले गेले आणि पूर्णपणे नष्ट केले गेले हे पाहिले जाऊ शकते. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की लक्ष्य लॉक होताच क्षेपणास्त्र डागण्यात आले आणि काही क्षणातच लढाऊ विमान आगीत रूपांतरित झाले. हा हल्ला हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्याद्वारे करण्यात आल्याचे मानले जाते.

इस्रायली हवाई दलाने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, "काही काळापूर्वी इस्रायली सैन्याने मध्य इराणमध्ये तीन एफ-14 लढाऊ विमानांवर हल्ला करून ते नष्ट केले. इस्रायली लढाऊ विमाने इराणमधील अनेक लष्करी तळांवरही हल्ला करत आहेत." इराणकडून अद्याप या घटनेची अधिकृतपणे पुष्टी झालेली नसली तरी, इस्रायली सैन्याने एफ-14 लढाऊ विमान पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा केला आहे.

इराणचे इस्रायला प्रत्युत्तर :

अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला. त्यानंतर इराणने इस्रायलवर हल्ला करत चोख प्रत्युत्तरदेखील इराणनेही तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या नवीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान मध्य आणि उत्तर इस्रायलमध्ये सायरन वाजले आहेत. सध्या इराणच्या संरक्षण यंत्रणा हायअलर्टवर असून, देशभरात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com