गाझामध्ये इस्रायलचा हवाई हल्ला, शेकडो नागरिकांचा बळी
इस्राइलने पुन्हा एकदा गाझावर हल्ला केला आहे. अल जजीराच्या मते या हवाई हल्ल्यामध्ये आतापर्यंत 326 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शेकडो लोक जखमी झाले आहेत. 19 जानेवारीला इस्राइल-हमास यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामध्ये हा सर्वात मोठा हल्ला केला आहे.
गाझामधील हमासच्या तळांवर हल्ला केल्याचे इस्रायली आर्मीचे म्हणणे आहे. इस्राइलच्या लष्कराने गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले केले जात आहेत. दरम्याने या हल्ल्यामध्ये महिला,मुलं तसेच सामान्य जनतेला लक्ष्य करायचे होते. दरम्यान गाझामधील दीर अल-बलाहमधील तीन घरे, गाझा शहरातील एक इमारत आणि खान युनूस आणि रफा या ठिकाणी बॉम्ब हल्ले केले आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यात ऑक्टोबर 2023 पासून तणाव सुरू आहे. 17 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपुष्टात आणण्यासाठी जानेवारीत शस्त्रसंधी करण्यात आली होती. या करारात इस्रायलने दोन हजार पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आणि त्या बदल्यात हमासने डझनभर इस्रायली बंधकांची सुटका केली. या सगळ्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण होईल असे वाटले होते. मात्र या हल्ल्यामुळे शांततेची आशादेखील मावळली आहे.