देश-विदेश
आयआयटी बाबाला जयपूरमधून अटक, तात्काळ जामीनही मंजूर, कारण...
मात्र आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
महाकुंभ मेळ्यामुळे आयआयटी बाबा उर्फ अभय सिंह चांगलाच चर्चेत आला. त्यानंतर त्याने भारत-पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या सामान्यामध्ये भारताचा पराभव होणार असेही म्हंटले होते. त्याच्या या व्यक्तव्यानंतर त्याला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. मात्र आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
आयआयटी बाबाजवळ गांजा आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक कायद्याअंतर्गत आयआयटी बाबाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बाबाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला लगेच जामीन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडे गांज्याबद्दल चौकशीदेखील केली त्यावेळी त्याने हा प्रसाद असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, "मी अघोरी बाबा आहे. परंपरेनुसार आम्ही गांजाचे सेवन करु शकतो".