Pahalgam Attack Video : पर्यटक पळू लागले, गोळीदेखील लागली, पण...पहलगाम हल्ल्यादरम्यानचा नवीन व्हिडीओ समोर

Pahalgam Attack Video : पर्यटक पळू लागले, गोळीदेखील लागली, पण...पहलगाम हल्ल्यादरम्यानचा नवीन व्हिडीओ समोर

अशातच आता या हल्ल्यादरम्यानचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
Published by :
Shamal Sawant
Published on

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रोज त्या संदर्भातील एखादी नवीन माहिती समोर येत आहे. या हल्ल्याचा तपास NIA कडून केला जात आहे. दरम्यान या तपासामध्ये अनेक खुलासेदेखील करण्यात आले आहेत. यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. तसेच काही जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. अशातच आता या हल्ल्यादरम्यानचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक पर्यटक झीपलाइनचा आनंद घेताना दिसत आहे. त्याचवेळी त्या ठिकाणी गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये खाली काय चाललं आहे? याबद्दल कोणतीही कल्पना असलेली दिसून आली नाही. तो व्यक्ती मात्र आनंद लुटताना दिसत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यामध्ये दहशतवाद्यांची क्रूरतादेखील दिसून येत आहे. सगळे पर्यटक भीतीने सैरभैर पळताना दिसत आहेत. तसेच एका व्यक्तीला गोळी लागून तो खाली पडलेला दिसत आहे. सर्व पर्यटक आणि गोळीबारीचा आवाजदेखील स्पष्टपणे ऐकू येत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अनेक भयंकर व्हिडीओ समोर आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com