राज्यसभेत जया बच्चन कडाडल्या, म्हणाल्या, "अशाने मनोरंजन क्षेत्र संपेल..."
बॉलिवूड अभिनेत्री व राज्यसभा सदस्या जया बच्चन यांनी राज्यसभेत केलेले भाषण खूप चर्चेत राहिले आहे. जयाबच्चन यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी सरकारने मनोरंजन क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. राज्यसभेतील जया बच्चन यांचे भाषण चांगलेच चर्चेत आले आहे. त्याचप्रमाणे जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पावरही भाष्य केले आहे.
जया बच्चन यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पाविषयीची नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये त्यांनी मनोरंजन क्षेत्रासाठी कोणतीच तरतूद केली नसल्याचे म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, "यावेळी अर्थसंकल्पात मनोरंजन क्षेत्रासाठी कोणतीही तरतूद नाही. मनोरंजन क्षेत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सरकारने दुर्लक्ष केल्याने सिंगल स्क्रीन थिएटर्सची हत्या होत आहे. त्यामुळे लवकरच कुलूप लागेल".
पुढे त्या म्हणाल्या की, "यापूर्वीच्या सरकारने अशाच चुका केल्या मात्र यावेळी तर सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेल्या. सगळे सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद होत आहेत. तसेच प्रेक्षकांनीदेखील पाठ फिरवली आहे. या क्षेत्रामध्ये मजुरीवर काम करणारे अनेक लोक आहेत. चित्रपट संपूर्ण देशाला जोडून ठेवतात. मी आज या ठिकाणी मनोरंजन क्षेत्राच्या वतीने बोलत आहे. या क्षेत्रावर दया करा आणि वाचवा अशी मी विनंती करते. जो अर्थसंकल्प सादर झाला ते पाहिल्यानंतर मनोरंजन क्षेत्र संपेल अशी भीती वाटत आहे". दरम्यान जया बच्चन यांचे हे वक्तव्य खुप चर्चेत आले आहे.