Japan : दक्षिण-पश्चिमी जपानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप, हवामान खात्याने दिली चेतावणी

Japan : दक्षिण-पश्चिमी जपानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप, हवामान खात्याने दिली चेतावणी

दक्षिण-पश्चिमी जपानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप, सुनामीची चेतावणी जारी. हवामान खात्याच्या माहितीनुसार, लाटा एक मीटरपर्यंत पोहोचू शकतात. जपान हे भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील प्रदेश आहे.
Published by :
shweta walge
Published on

दक्षिण-पश्चिमी जपानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप आल्याचे जपानच्या हवामान विभागाने सांगितले आहे. भूकंपाच्या धक्क्यांनंतर त्वरित सुनामीची चेतावणी देखील जारी करण्यात आली. रात्री 9.19 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, आणि त्यानंतर मियाजाकी शहरात सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. त्याचबरोबर, जवळच्या कोच्ची शहरात सुनामीची चेतावणी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सुनामीच्या लाटा एक मीटरपर्यंत पोहोचू शकतात. ज्वालामुखी कन्स, रिंग ऑफ फायर आणि फॉल्ट लाईनच्या काठावर स्थित असलेल्या जपानला भूकंपाचे धक्के सतत बसतात. त्यामुळे जपान हे भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील प्रदेश आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com