Coronavirus : कोरोना पुन्हा आला? देशात 257 संशयित रुग्ण तर मुंबईचा आकडा किती?
(Coronavirus ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
यातच आता कोरोना पुन्हा एकदा आल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असून देशातील कोरोना संशयितांची संख्या 257 वर पोहोचल्याची माहिती मिळत आहे. तर मुंबईत कोरोनाचे 95 संशयित रूग्ण सापडल्याची माहिती मिळत असून सर्वाधिक रूग्ण केरळमध्ये सापडले असून केरळमध्ये संख्या 95वर पोहोचली आहे.
याच पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क झाली असून आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्या आणि सतर्क राहा, आणि लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगण्यात येतं आहे.